ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘पारनेर माझी आई तर पाथर्डी माझी मावशी’, खा. लंके यांनी सांगितली आगामी राजकीय गणिते.

पारनेर माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. म्हणूनच मी प्रत्येक कार्याचा शुभारंभ या तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी येथून करतो. लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्वांचे सहकार्य व मोहटा देवीच्या आशीर्वादाने मी विजयी झालो.

आता विधानसभेची तयारी सुरू करून अॅड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आजपासून तयारी सुरू करा, असे आवाहन करीत जिल्ह्यातील सर्व १२ आमदार महाविकास आघाडीचेच निवडून आणण्यासाठी मी आतापासूनच कामाला लागलो आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केले.

पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे नागरी सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी खासदार लंके बोलत होते. यावेळी अॅड. प्रताप ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाट, योगिता राजळे, रत्नमाला उनमले, नासिर शेख, रामराव चव्हाण, रणजीत बेळगे, अर्जुन धायतडक, एजाज शेख आदी उपस्थित होते.

जे तुमच्या मनात आहे, ते माझ्याही मनात असून, येत्या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत प्रताप ढाकणे आमदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, तुम्ही फक्त मला साथ द्या, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. या वेळी बोलताना लंके म्हणाले की, पारनेर माझी आई, तर पाथर्डी माझी मावशी आहे.

मोहटा देवीवर आपली श्रद्धा असल्याने आपल्या प्रचाराची सुरवात आपण मोहटा देवीगडावरून केली, तर प्रचाराची सांगता सभा सुद्धा पाथर्डीत केली. अवघ्या १४ वर्षांच्या राजकीय जीवनात आपण सरपंच ते खासदार झालो, ते केवळ जनतेच्या जीवावर झालो आहोत. लोकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. लोकांनी जो आशीर्वाद दिला, तो मी शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. तालुक्यात पाणीटंचाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. मात्र प्रशासनाला सोबत घेऊन आपण ते सोडवणार आहोत.

आपल्यातील कार्यकर्ता जिवंत असला तर जनता डोक्यावर घेते. मात्र सत्तेची हवा डोक्यात गेल्यास जनता डोक्यावरून खाली उतरवते. यामुळे जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण जनहिताचे असते. पाथर्डी शेवगाव मतदारसंघांमध्ये तब्बल ११० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

यामुळे आगामी काळात शेती, पाणी, रोजगार आदी समस्यावर काम करावे लागणार आहे. येथील सर्व विभागीय अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध समस्या वर उपाय शोधून आगामी पाच वर्षात मिळालेल्या पदाच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहू.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे