लोकसभा निवडणूक 2024 अखेर निकाल जाहीर आली रे आली तु तरी आली
अहमदनगर शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री, निलेश लंके त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांना , 29 ,हजार 317 जास्त मतांनी विजयी मिळविला ,निलेश लंके म्हणाले की महाविकास आघाडी व सर्व सामान्य लोकांनी मला निवडून दिले आहे . महाविकास आघाडीचे आभार येणाऱ्या काळात सर्व असावं सामान्य नागरिकांसाठी काम करीन , निलेश लंके म्हणाले मला आता जनतेच्या निवडून दिले आहे ,मी सर्वांचे आभार मानतो.
निलेश लंके म्हणाले खरंतर हा विजय माझ्या शेतकरी बांधवांचा व नवीन तरुणांना व माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून मला साथ देणारे शिवसेना ,आम आदमी पार्टी , राष्ट्रवादी , व सर्व संघटनांनी खूप मेहनत घेतली .
या सर्वांचे मनापासून धन्यवाद मला सर्वात मोठे साथ म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब व बाळासाहेब थोरात यांचे आहे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांचे मार्गदर्शन आहे , आज माननीय अनिल भैय्या राठोड असल्याले असते तर त्यांना वेगळाच आनंद झाला असता ,असे ते म्हणाले व मला मुस्लिम समाजांनी सुद्धा चांगली साथ दिली सर्व संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी चांगले साथ दिली.
विरोधकांचा पण खरा अर्धा वाटा आहे , भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष राहू लागून होते. निलेश लंके यांनी शरद पवार गटातून दाखल होत तूतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सुजय विखे यांनी उमेदवारी जाहीर झाली होती असं ते म्हणाले .