ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन

पुणे

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. वल्लभ बेनके यांचा जन्म २३ जून १९५० रोजी हिवरे बुद्रूक या छोट्याशा गावात झाला. ते व्यवसायाने शेतकरी होते.

पुढे राजकारणात प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नरच्या घराघरात पोहोचवला. सलग सहा वेळा वल्लभ बेनके यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. यापैकी चार वेळा ते निवडून आले. त्यांनी १९८५ ते २००९ या काळात आमदार म्हणून काम केले.

कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची जाण असणारा आणि प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता, कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा, मुत्सद्दी नेता अशी त्यांची ओळख झाली. वल्लभ बेनके यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. कृष्णा खोरे विकास महामंडळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या कार्यकाळात कांदळी येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसराकरिता विकासनिधी उपलब्ध झाला.

नारायणगाव येथे टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू झाले. प्रशासनावर पकड असणारा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. मात्र मागील काही वर्षांपासून आजारी असल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे