
न्युज मिडिया क्षेत्रात मी गेले ३ वर्षा पासून मॅनेजर नंतर सह संपादिका, निवासी संपादिका म्हणून काम करत होते. मिडिया क्षेत्रातील माझे नाव टाॅप सहा लेडीज मध्ये घेतलं जातं हे मी अभिमानाने सांगत आहे. कारण मिडिया क्षेत्रात अहमदनगर मध्ये खुप कमी लेडीज काम करत आहेत..
तसेच माझं काम पुढील प्रमाणे –
आत्ता पर्यंत चालू करुन पुर्ण केलेले विशेष पुरवणी अंक
१. युवा उद्योजक विशेषांक (डेली पेपर मध्ये)
२. संस्कृत विषयी ची माहिती (डेली पेपर मध्ये)
३. ऑनलाईन पोर्टल वर लेखनमाला
४. नवरात्री स्पेशल – ब्युटी पार्लर अंक विशेषांक..
तसेच इतर ॲक्टीव्हीटी …
१. मुलाखत घेणे
२. ॲक्टिंग क्लास घेणे
३. ॲवॉर्ड प्रोग्रॅम
४. शाॅपिंग फेस्टिव्हल
५. एखाद्या इव्हेंट ला मिडिया पार्टनर म्हणून संपूर्ण कार्यक्रम करणे..
गेले १२ वर्ष चाकोरी बध्द नोकरी करत आले.. आणि साईड बिझनेस ही करत आहे.. त्यामुळे मार्केटिंग चा अनुभव ही आहे…
माझा स्वतःचा बिझनेस AR foods या नावाने प्रसिद्ध च आहे.. त्या च बेस वर AR Event आणि AR Digital Media, online news portal,YouTube चॅनेल ची स्थापना केली…
आता अपकमिंग इव्हेंट माझे काम चालूच आहे.. लवकरच तुम्हाला वेळोवेळी समजत जाईल…
AR Event च्या माध्यमातून घेतले जाणारे सर्व इव्हेंट, स्पेशल पुरवणी अंक, बातम्या संपूर्णतः डिजिटल स्वरूपात असणार आहे.. त्या सोबत सोशल मिडिया,AR Digital Media online news portal आणि YouTube चॅनेल वर शेअर केले जातील. जिथे गरज वाटेल तिथे च प्रिंट काढून दिली जाईल..
कारण आजकाल प्रिंट, टीव्ही मिडिया नंतर सध्या डिजिटल मिडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार आहे..