ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सर्व बाजूंनी सुरक्षित असणार भव्य राम मंदिर सोहळा

अयोध्या नगरीत राम मंदिराचा भव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.

शहराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि विशिष्ट व्यक्ती, यात्रेकरू व पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

अयोध्या नगरी विविध धार्मिक कार्यक्रमांनी, भक्तगण आणि साधू-संतांनी दुमदुमली आहे. या सोहळ्याला हजारो भक्तगण, मोठ्या संख्येने साधू-संत आणि विशिष्ट व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेश सरकार शहराच्या सुरक्षेत कोणतीही कसर राहणार नाही याची काळजी घेत आहे. थल, जल, वायू अशा सर्वोपरी सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे