मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सभेची जोरदार तयारी..
अहिल्यानगर शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

अहिल्यानगर शहरात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन महायुतीचे उमेदवार मा. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा मंगळवार दि . ७/ ५/ २०२४ रोजी नगर मधील संत निरंकारी भवन जॉगिंग पार्क शेजारी मोकळ्या मैदानात सायंकाळी ४ वाजता या सभेची जोरदार व जय्यत तयारी करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महायुतीचे उमेदवार डाॅ ,सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे ,या सभेसाठी संयोजकांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून गेले चार पाच दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे.
या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यापुर्वी नगर मध्ये याच मैदानावर मागील निवडणुकीच्या काळात स्व ,दिलीप गांधी यांच्यासाठी तर दुसर्यांनदा मागील पंचवार्षिक डाॅ ,सुजय विखे यांच्यासाठीच येथे आले होते ,या दोन्हीही सभा भाजपाचे दोन्ही उमेदवार झाले होते. आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी यांची याच मैदानावर ही सभा होत आहे . त्यामुळे या सभेला गर्दीचा उच्चांक मोडला जाण्याची शक्कता आहे.
सध्या जिल्ह्य़ात त्यांचेच वातावरण असुन पंतप्रधानांच्या सभेला अधीक भर पडणार असल्याची शक्कता आहे.
नगर करांचे नरेंद्र मोदी यांच्यावर विषेश प्रेम असुन त्यांचे स्वागतासाठी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी लोटणार असुन त्यांचे नियोजन करण्यासाठी सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत आहे.