
भारतीय पर्यटन विकास को-ऑप सोसायटी लि. हि महाराष्ट्रातील प्रथम व एकमेव अशी पर्यटन राज्यस्तरीय संस्था म्हणून कार्यरत आहे.
संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा दि : २५/०९/२३ रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल रागा इम्पेरिओ, ताथवडे, पुणे या ठिकाणी पार पडली.अत्यंत खेळी-मेळीच्या वातावरणात व आनंदात सदर सभा पार पडली.
भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी हे सभासदांकडून अनुमोदन करण्यात आले.
प्रथमेश कुलकर्णी यांच्या स्वागतपर राष्ट्रगीताने सभेची सुरवात झाली. जेष्ठ पर्यटन व्यावसायिक श्री दत्ता भालेराव यांची सर्वानुमते अध्यक्ष स्थानी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.
सुरेंद्र कुलकर्णी (सेक्रेटरी) यांनी वार्षिक सभेमध्ये, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले , तसेच मागील वर्षातील इतर उपक्रम वाचून दाखवले.
श्री दुष्यंत देसाई (खजिनदार) यांनी सन २०२२/२३ उत्पन्न खर्चाचा ताळेबंध दर्शविणारे, लेखापरीक्षण झालेले हिशोब पत्रक सर्वांसमोर मांडले.
याच वेळी श्री हेमंत जानी (संचालक) यांनी संस्थेचे पुढील ७ मोठे प्रकल्प जाहीर केले
अ) जानेवारी मधील पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल
ब) पर्यटन मित्र
क) पर्यटन रेल्वे
ड) फ्लोटिंग रेस्टॉरेंट
इ) पर्यटन वाढीसाठी पतसंस्था
ई) पर्यटन महाविद्यालय
फ) महाराष्ट्र ट्रॅव्हल मार्ट
तसेच मा श्री प्रविण घोरपडे (चेअरमन) यांच्या तर्फे सर्व सभेस मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्वांना नवीन जोमाने कामाला लागण्याची स्फुर्तीच मिळाली.
सदर कार्यक्रमस संस्थेचे आशिष हिंगमिरे , सिराज शेख व इतर सभासद उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष मा श्री दत्ता भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सभा मंत्रामुग्ध झाली आणि संतोष माने यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचीसांगता झाली ..