ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंती मिरवणूक

अहमदनगर

शिवरायांची वेशभूषा परिधान करणारे 21 बालके ठरली मिरवणूकीचे प्रमुख आकर्षण..

ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. हातात भगवे ध्वज तसेच शिवकालीन वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.मिरवणुकीतील शिवाजी महाराजांची पालखी आणि तब्ब्ल 21 विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा तसेच राजमाता जिजाऊ व महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली.शाळेपासून शंभो गार्डन ते ओंकार नगर पासून शाहूनगर बस स्टॉप व नंतर पुन्हा शाळेत असा मिरवणूक मार्ग होता.मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव संदीप भोर, ज्ञानसाधना गुरुकुल चे संचालक प्रसाद जमदाडे, शाळेच्या प्राचार्य रुचिता जमदाडे,निशिगंधा गायकवाड, सुप्रिया मुळे,कल्याणी शिंदे, प्रतिभा साबळे, सपना साबळे, रुक्मिणी साबळे,मीना गायकवाड,पूर्वा ढोरसकर,नक्षत्रा ढोरसकर,समीक्षा लहाने,किरण खांदवे,विठ्ठल नगरे,अथर्व माताडे, यश गायकवाड आदी सहभागी झाले होते.

मिरवणूक पाहण्यासाठी पालक व नागरिकांनी गर्दी केली होती मिरवणुकीच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी पाण्याचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे