ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात सहा महिन्यांत ८ कोटी ११ लाख ८८ हजारांची सायबर फसवणूक..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधे शेअर ट्रेडिंग, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन शेअर ट्रेडिंग, ऑनलाईन चोरी, सोशल मिडिया जसे की फेसबुक, इन्टा, व्हाट्सअ‍ॅपवरुन बदनामी व फसवणुकीचे अहिल्यानगर जिल्ह्यात सहा महिन्यांत एकूण २६ गुन्हे दाखल झालेले आहेत.

यामध्ये नागरिकांची ८ कोटी ११ लाख ८८ हजार ८३८ रुपयांची विविध पद्धतीने ऑनलाईन फसवणूक झाली, त्यापैकी एक कोटी रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले असून बाकी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.. अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.

यामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून सायबर गुन्ह्यात मिळवलेली रक्कम वापरण्यासाठी बँक खात्याचा वापर केला जातो. काही प्रलोभन त्यांना दाखवली जातात. मात्र, ही रक्कम घेताना सायबर गुन्हेगार इतकाच बँक खातेदारही गुन्हेगार असतो, त्यावरही कारवाई केली जाते. त्यांचे खाते गोठवली जातात. त्यामुळे नागरिकांनी अशा आमिषाला बळी न पडता सतर्क रहावे, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे