श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे संयुक्त विद्यमाने ” शिवाजी कोण होता” पुस्तकाचे वाटप
कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्त श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित ” शिवाजी कोण होता” ह्या पुस्तकाचा एक हजार प्रती चे वाटप करण्यात आले.
आज छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्त श्रम फाउंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित “शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचे” नागरीकांना वाटण्यात आल्या. ह्यावेळी श्रम फाउंडेशन चे अध्यक्ष कमलाकर सारंग ह्यांनी बोलताना सांगितले की सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या साठी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे सांगितले.
तर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चे महासचिव अरुण कदम ह्यांनी ज्येष्ठ समाजसेवक गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक समाजातील घटकांना जागृत करेल ,व समाजाला योग्य दिशा देणेस उपयोगी ठरावे ह्या साठीच शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाचे लिखाण झाले आहे . म्हणूनच ह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले चे सांगितले.
ह्यावेळी श्रम फौंडेशनच्या सचिव सौ.वैशाली सारंग, संपादक दैनिक मुक्त नायक, प्रसिद्ध गायक पी कुमार, दुय्यम निबंधक राजू कांबळे, हेमंत रुईकर, एस न्यूज चे संभाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वैशाली सारंग ह्यांनी केले तर आभार संतोष जोगदंडे ह्यांनी मानले.