महिलांना सुवर्णसंधी – महिलांसाठी असाच एक आगळावेगळा उपक्रम घेऊन येत आहे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी
अहमदनगर

गेली २० ते २२ वर्षे नगरमध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी हा महिलांचा क्लब सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे समाजोपयोगी कार्य करीत आहे .
आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत . व्यवसाय, उद्योगांकडे वगळण्याचे महिलांचे प्रमाण वाढत आहे . अजूनही खूप मोठ्या प्रमाणात स्रीयांना उद्योग विश्वात पाऊल ठेवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत .
महिलांमध्ये उपजतच असलेल्या गुणांचा त्यांना फायदा व्हावा म्हणून च रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांनी महिलांसाठी भव्य कार्यशाळा आयोजित केली आहे .
रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ६ या वेळांत अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडिअम स्कूल च्या हाॅलमध्ये ही कार्यशाळा संपन्न होत आहे .
या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या किचन क्वीन दीपाली बिहाणी या स्वतः महिलांना विविध प्रकारचे मसाले व इन्स्टंट मिक्स कसे बनवायचे हे शिकविणार आहेत .
ह्याचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून ही कार्यशाळा सर्वांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे . कार्यशाळेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रही प्रत्येकाला देण्यात येईल .
ही कार्यशाळा वेळेवर सुरु होणार आहे . कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नावनोंदणी आवश्यक आहे .
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी यांच्या मेंबर्स कडे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून लगेचच आपली उपस्थिती निश्र्चित करा .संपर्क 7028046868, 9822913822, 9370776058
जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन रो गीता गिल्डा यांनी केले आहे . प्रेसिडेंट रो देविका रेळे व सेक्रेटरी रो प्रभा खंडेलवाल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे .