ब्रेकिंगमहाराष्ट्र
6 लाख रुपयांची लाच, तुळजापूर मंदिर देवस्थानचा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात…
अहमदनगर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तुळजाभवानी देवी मंदिर संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मंदिर संस्थानचे लेखाधिकारी शिंदे यांनी 6 लाख रुपयांची लाच घेतल्याने घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यास सहा लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी शिंदे याने 10 लाख रूपयांची मागणी केली होती.
पंचासमक्ष सहा लाख रूपये रोख स्वीकारताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केली आहे.