
प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने आगडगाव ता. जि. अहिल्यानगर येथील भैरवनाथ विद्यालय मध्ये विदयार्थ्यांना व शिक्षकांना कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम पार पडला या वेळी रशिया येथून आलेले सर्जी यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. साळुंके यांनी सन्मान केला.
या वेळी उत्तर प्रदेशचे सहजायोगी राहुल चतुरवेदी, पुणे येथील संजय खरे, लोणी येथील डांगे सर, जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख मेजर कुंडलिक ढाकणे, मेजर उत्तम बेरड उपस्थित होते. यावेळी सुरुवातीस पालवे सर यांनी सहजयोग परिवारातील सदस्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्तविक श्रीनिवास बोज्जा यांनी करतांना सांगितले की, सहजयोग हा योग राहिलेला नसून महायोग झालेला आहे.
सहजयोग ध्यान साधना नित्य नियमाने केल्यामुळे विदयार्थ्यांना संतुलन प्राप्त होऊन एकाग्रता वाढते त्या मुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते व या मुळे विध्यार्थ्यांची अभ्यास प्रगती होते याची अनेक उदाहरण आमच्या कडून असून अनेक शाळांनी मान्य केलेले असून तसे पत्रही दिलेले आहेत. सहजयोगाची अनेक फायदे होत आहेत.
मेजर उत्तम बेरड यांनी सहजयोगाची माहिती देत सर्व विदयार्थी शिक्षकांना कुंडलिनी शक्तीची अनुभूती प्राप्त करून दिले. अनेक विदयार्थ्यांनी थंड चैतन्य लहारींची अनुभूती प्राप्त झाल्याचे मान्य केले.
शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. साळुंके सर यांनी आभार मानून हा कार्यक्रम दर महिन्याला आमच्या शाळेत घ्या अशी विनंती केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र आगारकर, श्री. रावसाहेब सोनार,सौ. जयश्री सामलेटी, श्री. व सौ. थोरात, कार्तिक ढाकणे आदींनी परिश्रम घेतले.