महिलांसाठी नेमक्या कोणत्या सात मुद्द्यांचा उल्लेख? अर्थमंत्र्यांनी केल्या या महत्वाच्या घोषणा
भविष्यात महिलांविषयी कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ सादर केला असून त्यांनी महिलांसाठी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.
1) यामध्ये आतापर्यंत महिलांसाठी केलेल्या कामाचा लेखा जोखा वाचला तसेच भविष्यात महिलांविषयी कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे त्याबाबत सांगितले.
2) सरकारी प्रयत्नामुळे महिलांची उद्योजकता २४ टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
3) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे.
4) एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे.
5) सर्व्हायकल कँसरबाबत ९ ते १४ वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
6) गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे.
7) तीन तलाक प्रथेला बेकायदेशीर ठरविले.
महिलांसाठी विधानसभेमध्ये एक ततृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.