ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

रूट्स प्री स्कुल चे स्नेहसंमेलन संपन्न

अहमदनगर

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही – गोल्ड मॅन

रूट्स प्री स्कुल चे 5 वे स्नेह संमेलन माऊली संकुल येथे पार पडले या वेळी पुणे येथील मल्लव अँड सन्स ग्रुप चे डायरेक्टर गोल्ड मॅन ब्रदर्स निशिकांत मल्लव व आकाश मल्लव तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, माजी सैनिक खुशाल हलगुंडे, माजी सैनिक वशिवळे व सौ. पूनम मल्लव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी बोलतांना गोल्ड मॅन मल्लव म्हणाले आज शिक्षण हे जीवनातले अविभाज्य घटक आहे, कोणतीही गोष्ट असो शिक्षण लागतेच यासाठी जर आपणास जीवनात यशस्वी व्हायचे असेल शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा म्हणाले गेले 3-4 वर्षांपासून रूट्स प्री स्कुल चे चांगले नाव लौकिक आहे. या शाळेतील प्रिन्सिपल शिक्षक हे शाळेतील विदयार्थ्यांसाठी फार कष्ट घेतात, यामुळे विदयार्थी नक्कीच हुशार बनतात, या शाळेचे भवितव्य भविष्यात नक्कीच उज्वल असेल असे बोज्जा म्हणाले.

या वेळी संस्थेचे संचालक सतीश परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेचे प्राचार्य सौ. अपेक्षा परदेशी यांनी शाळेच्या वर्षभराच्या झालेल्या कार्यक्रमा बाबत माहिती दिली व पुढे विदयार्थ्यांसाठी कोण कोणत्या ऍक्टिव्हिटीस राबवणार या बाबत माहिती दिली.

या वेळी शाळेने हिंदुस्थान साम्राज्य या विषयावर स्नेह संमेलन मध्ये विदयार्थ्यांकडून नाटक तसेच गाणे बसवले विदयार्थ्यांनी या सर्व कर्यक्रमा मध्ये हिरारीने भाग घेतला .

या वेळी शाळेने मास्टर रूट्स प्री स्कुल, मिस रूट्स प्री स्कुल, बेस्ट स्टुडंट, बेस्ट क्लास, बेस्ट टीचर असे अवार्ड दिलेत. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक मिस्टर ब्रिजेश,मिसेस प्रीती बर्फे, सोनाली मोहिते, शिवांगी सिंग, सविता डोंगरे, स्वाती आठरे, रुपाली भुसारे, पूनम गिते, रुपाली केदारे व ज्योत्स्ना घेमूड या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा परदेशी यांनी केले. शेवटी आभार शाळेचे प्रिन्सिपल अपेक्षा परदेशी यांनी मानले कार्यक्रमास पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे