ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेच्या ‘या’ बड्या आरोपीला बेड्या

अहमदनगर

नगर जिल्ह्यातील सर्वात गाजलेले आणि चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे नगर अर्बन बॅकेतील घोटाळा. या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया पळण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली आहे. नगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नगर अर्बन बॅंकेचा (Nagar Urban Co-op. Bank Ltd) माजी अध्यक्ष अशोक कटारिया हा पळून जाण्याच्या तयारी होता.

कटारिया हा नगर अर्बन बॅंकेतील सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी परिवाराचे निकटवर्तीय आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला आळेफाटा (पुणे) येथून आज पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. आता त्याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

नगर अर्बन बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणात 26 जानेवारीला भाजपचा माजी नगरसेवक तसेच माजी संचालक मनेष साठे आणि नगर अर्बन बॅंकेचा माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी यांना अटक केली होती. या दोघांना न्यायालयाने 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिस या प्रकरणी सक्रिय झाल्यानंतर नगर अर्बन बॅंकेचे संचालक मंडळ आणि बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे भाजपचे दिवगंत माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि त्यांच्या परिवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या गांधी परिवार नगरमध्ये नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे