ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मराठा समाज बांधवांकडून लाडू वाटप, फटाक्यांची आतषबाजी

मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले.

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता. आंबेगाव तालुक्यात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.सुनिल बांगर, आंबेगाव तालुका मराठा आरक्षण आंदोलन समितीचे समन्वयक वसंतराव बाणखेले, मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे पाटील, माजी सरपंच दत्ता गांजाळे, उद्योजक अजय घुले यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आंदोलन, उपोषण करण्यात आले होते.

शनिवारी (ता.२७) राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून याबाबत अध्यादेशही काढण्यात आला आहे. ही घोषणा राज्य शासनाने केल्यानंतर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, वसंतराव बाणखेले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आशिष घोलप, माजी सरपंच मिरा बाणखेले,अश्विनी शेटे, संगिता बाणखेले, प्रवीण मोरडे, परशुराम भेके,संदीप बाणखेले, संदीप जुंदरे, संदीप निघोट, गणेश खानदेशे, कुणाल बाणखेले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव बाणखेले यांची यावेळी मिरवणूक काढण्यात आली.

“समाज बांधवानी एकजूट दाखवून दिलेल्या पाठींब्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले आहे.यापुढेही समाज बांधवानी एकजूट कायम ठेवावी.”असे आवाहन वसंतराव बाणखेले यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे