अहमदनगरमध्ये आलेल्या क्रीडा मंत्र्यांपुढे खेळाडूंनी मांडली व्यथा, मंत्र्यांनी लगेच एक कोटी रुपये
अहमदनगर

क्रीडामंत्री संजय बनसोडे हे काल (२१ जानेवारी) अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलास भेट दिली.
ते यावेळी म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांसाठी २५ कोटी रुपये खर्चाचा पाठवलेला आराखडा सुधारित करून ५० कोटी रुपयांपर्यंत तरतुदींचा पाठवा. त्याला आपण मान्यता देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. क्रीडा संकुल जिल्हा दर्जाचे असले तरी विभागीय दर्जाचे बनवण्यासाठी मदत करू असे ते म्हणाले. क्रीडामंत्री बनसोडे यांनी काल जिल्हा वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली.
यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्यासह विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी क्रीडामंत्र्यांनी ही ग्वाही दिली. जिल्हा क्रीडा संकुलात ममिशन लक्षवेध अंतर्गत धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची सूचनाही क्रीडा मंत्र्यांनी केली. मिनल काळे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. जिल्हा क्रीडा परिषदेचे सदस्य श्रीकांत निंबाळकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
क्रीडा संकुल अंधारात..खेळाडूच्या तक्रारीनंतर ‘ती’ सूचना
क्रीडामंत्री बनसोडे यांनी मैदानावर खेळाडूंची भेट घेतली. तिथे जिल्हा अथलेटिक संघटनेतर्फे धावण्याच्या स्पर्धेची तयारी खेळाडू करत होते. या खेळाडूंसमवेत मंत्र्यांनी चर्चा केली. त्यातील एका खेळाडूने संकुलात दिव्यांची व्यवस्था नाही, त्यामुळे अंधार असतो, डास फार चावतात, याकडे लक्ष वेधले.
मल्लखांब संघटनेच्या खेळाडूंच्या पालकांनीही संकुलात अंधार असतो, अशी तक्रार केली. इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्याकडे लक्ष वेधले. त्यावर मंत्र्यांनी आराखड्यात मफ्लड लाईटफ्च्या व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याची सूचना जिल्हा क्रीडाधिकारी दिघे यांना केली.
जिल्हा पुरस्कार सुरु करण्याची मागणी
संघटनांना क्रीडा संकुलात कार्यालय उपलब्ध करावीत संघटना दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार बंद करण्यात आला तो पुन्हा सुरू करावा, जिल्हा पुरस्कार गेल्या चार वर्षापासून निधी अभावी बंद आहेत ते पुन्हा सुरू व्हावेत सायकलिंग संघटनेसाठी खेळा खेळाडूंसाठी विभागवार मैदाने उपलब्ध व्हावीत, जुदो खेळासाठी मॅट उपलब्ध करा आदी मागण्या करण्यात आल्या.