बापच बनला सैतान – 3 वर्षीय मुलीवर केला अत्याचार
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

नवी मुंबईत लेक आणि बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. ३ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बापानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय.
पीडित मुलीवर नराधम बापानं अत्याचार केला असून, ही बाब पीडित आईला समजताच तिनं बापाला जाब विचारला.मात्र, बापानं आईला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या घणसोली रोड परीसरात घडली आहे. २६ डिसेंबरला पीडित तीन वर्षीय मुलगी घरात एकटी होती. आरोपी पित्यानं आपल्या पोटच्या मुलीसोबत अश्लील आणि लैगिंक चाळे केले. नंतर जबरदस्तीनं लैगिंक अत्याचार केला. ही धक्कादायक माहिती मुलीनं आपल्या आईला दिली.मात्र, बापानं आईला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या घणसोली रोड परीसरात घडली आहे. २६ डिसेंबरला पीडित तीन वर्षीय मुलगी घरात एकटी होती. आरोपी पित्यानं आपल्या पोटच्या मुलीसोबत अश्लील आणि लैगिंक चाळे केले. नंतर जबरदस्तीनं लैगिंक अत्याचार केला.
ही धक्कादायक माहिती मुलीनं आपल्या आईला दिली.रबाळे पोलीस ठाणे गाठण तिनं सगळी माहिती सांगत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी अधिक तपास करीत आरोपी बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी रबाळे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून, नराधम बापाला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.