ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

प्रियंकाज् स्पेशल ब्लॉग – बालपणी चा वाढदिवस

अहमदनगर

आज माझा वाढदिवस. तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप आभारी आहे.

खर सांगायच तर ज्या वाढदिवसाबद्दल लहानपणी खूप भारी आकर्षण होते ते आता काही राहील नाही. लहानपणी सगळे शाळेतील मित्र मैत्रिणी घरी यायचे.आई छान शिऱ्या चा केक बनवून त्याला मस्त डेकोरेट करायची.घरी मुलांना खायला पोहे,उपमा बनवला जायचा .मुरमुरे,चॉकलेट जोडीला असायचेच.मस्त ड्रेस घालून दिवसभर माझा वाढदिवस ,माझा वाढदिवस म्हणून आनंद गगनात मावत नसायचा .आधी शालेय ओक्षण केलं जायचं.मुलांना ,शिक्षकांना शाळेत वाटायला चॉकलेट असायचे.तेव्हा गिफ्ट द्यायलाच हवेत अस काही नव्हत.शिक्षकांचे कौतुकाचे बोल ,कौतुकाची पाठीवर थाप कुठल्या गिफ्ट पेक्षा कमी नसायची.त्यांचे आशीर्वाद नेहमी सोबत असायचे.आई नेहमी फुलांचे गजरे करून द्यायची.ते घालून मिरवायला भारी वाटायचं.

घरी संध्याकाळी सगळे हजर झाले की मस्त खुर्ची वर बसून मी तयार असायचे.आई,काकू,शेजारील काकू सगळ्यांकडून ओवाळून घेतल की मग केक कापला जायचा. आई ने बनवलेल्या केक च्या भोवती मेणबत्ती लावलेल्या असायच्या. त्या फुंकल्या की happy birthday to you म्हणत सगळे एकच आवाज गुंजायचे.

सगळ्यांनी आणलेली गिफ्ट च्या स्वरूपातील biscuit चे पुडे,कोणी दिलेली वही,मेहंदी कोन, टिकली पाकीट,छोटे कानातले पाहिलं की खूप भारी वाटायंच.या पेक्षा अजून जास्त मोठ्या गिफ्ट  ची आवश्यकता कधी भासली नाही कारण त्या गोष्टींमध्ये आनंद खूप दडलेला असायचं.तेव्हा फोटोसाठी मोबाईल नसले, सेल्फी नसल्या तरी आयुष्यभर आठवणीत राहतील असे क्षण होते जे आजही डोळ्यांच्या ,स्मृतींच्या नजरेत कैद आहेत.जे कधीही डिलिट होणारे नाहीत. रिटर्न गिफ्ट ची तेव्हा पद्धतच नव्हती.सगळे मित्र मैत्रिणी घरी गेले की थोरा – मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले जायचे.खूप छान दिवस होते ते .

बालपण सरत गेले आम्ही मोठे होत गेलो , शिक्षण ,लग्न , मुले,संसार आता या मध्ये कुठे तरी गुंतून गेले .लहानपणी च्या वाढदिवसाची गंमत जम्मत तिथेच थांबली .

आज आयुष्याच्या मागे वळून बघताना अस वाटत की आपण आपल्या आयुष्यात काय कमवल व काय गमवल .काय शिकलो व काय शिकवलं . आयुष्यातील एक वर्ष वाढले म्हणून आनंद मानावा की आयुष्यातील एक वर्ष कमी झाले म्हणून दुःख.जी शिकवण आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांनी दिली,जे त्यांनी चांगले संस्कार आपल्या वर घडवले , त्या साठी खरच आपण पात्र ठरलो का ? जे शिक्षण त्यांनी दिले त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यासाठी करतोय का? ज्यांनी स्वतः हा आपल्यासाठी आयुष्यभर तडजोड केली त्यांच्यासाठी आपण थोडी तडजोड करायला तयार आहोत का ?

घरच्या बाहेर पडल्यानंतर जे जग पाहिलं,जे चांगले ,वाईट अनुभव पाहिले,घेतले त्यातून थोडेफार तरी शिकून आता पुढे जायचं आहे.ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते त्या कमी करायच्या आहेत.जिथे खरच बोलायची गरज आहे तिथे शांत न बसता बोलायचं आहे.

एखादी गोष्ट,एखादा विचार नाही पटला तर नाही म्हणायला शिकायच आहे.स्वतःवरच विश्वास वाढवायचा आहे.स्वतःच्या आवडी निवडी जपायाच्या आहेत.

स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचे आहे. अती विचार,अती काळजी ,अती विश्वास, या अती अती गोष्टी कमी करायच्या आहेत.

ज्यां आई वडीलांनी जग दाखवलं त्यांच्या आता उरल्या सुरल्या आयुष्यासाठी काही तरी करायचं आहे.त्यांच्या आयुष्यात थोडी तरी सुखाची झूळुक आणायची आहे.

सगळ्यांचा विचार करता करता स्वतःचा विचार करायचा आहे. बघू जमतंय का . प्रयत्न करायचे आहेत .

कधी तरी स्वच्छंदी पक्ष्या सारखं उंच उडायचं आहे.

मी माझा मुलगा – एक सुखद क्षण 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे