घरकुल बांधकाम संबंधी भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासंबंधी जिल्हा परिषद कडे तक्रार
प्रतिनिधी - रोहित गांधी

लोणार तालुक्यातील शारा येथील मंजूर घरकुल लाभार्थी यांच्या सोबत संगनमत करून घरकुल न बांधता घरकुलाचे हप्ते वितरीत होत असल्या बाबत तसेच तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळपाहणी व चौकशी करून ग्रामसेवक यांना पत्रव्यवहार केला परंतु पत्रव्यवहार नुसार अद्याप कार्यवाही न करता फक्त कागदोपत्री घोडे नाचविणे सुरु असल्याबाबत विषयाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना संतोष सूर्यभान डव्हळे व सचिन सत्यनारायण डव्हळे यांनी आज दिनांक १५ जानेवारी रोजी केली आहे.
याबाबत सविस्तर तक्रारी नुसार दिनांक 08/11/2023 रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे मौजे शारा येथे पंतप्रधान आवास योजना प्रपत्र ड यादी नुसार आज रोजी अंदाजे 84 घरकुलाचे काम सुरू असतांना मंजुर लाभार्थ्यां पैकी काही लाभार्थ्यांनी अदयाप पर्यंत घरकुल बांधकाम सुरूच केले नसतांना मात्र आज पर्यंत दोन हप्ते पंचायत समिती कार्यालयाकडुन वितरीत होत आहेत.
यावरून ग्रामपंचायत सरपंच, सचिव व पंचायत समिती कार्यालयातील संबंधीत हप्ते देणारे अधिकारी / कर्मचारी हे संगणमत करून घरकुल जागा पाहणी न करता, घरकुल बांधकाम सुरू आहे किंवा कसे हे न पाहता लाभार्थी यांना घरकुल न बांधता घरकुलाची रक्कम त्यांच्या खात्यात टाकुन नंतर संबंधीत लाभार्थी यांच्याकडुन या कामाचे कमीशन घेत असल्याचा मला आज रोजी संशय निर्माण झाला आहे.
कारण काही लाभार्थी यांना हप्ता वितरीत करण्यासाठी त्यांच्या घरकुलाचे काम, बांधकामाचे फोटो मागणी करून दहा ते बारा चकरा मारल्या नंतर हप्ते टाकण्यात येत आहे. परंतु पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांना कमीशन देणा-या लाभार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे बांधकामाचे फोटो बांधकाम सुरू आहे किंवा कसे हे पाहण्यात येत नाही अशा प्रकारे हातामध्ये असलेल्या कायदयाचा दुरूपयोग ग्रामपंचायत तसेच घरकुल विभागाचे कर्मचारी करीत असल्याचा व इतर नमूद तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालयाकडुन मंजुर असलेल्या 83 घरकुलांची स्थळ पाहणी करण्यात आली असुन चौकशी समितीस त्रुटी आढळुन आल्या आहेत.
ज्यामध्ये 1) 30 घरकुल लाभार्थ्यांना 15000/- रू. अग्रीम हप्ता देवुन सुध्दा अदयाप पर्यंत कामे सुरू केली नसल्याचे नमुद आहे, 2)लाभार्थ्यांनी दिलेल्या अनुदानाच्या रक्कमेच्या मुल्यांकनानूसार बांधकाम पुर्ण केली नाहीत, 3) काही लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता मिळाला किंवा नाही याचा खुलासा ग्रामसेवक यांना मागविण्यात आला आहे, 4) लाभार्थ्यांचे बांधकाम पाहणी करतांना गाव नमुना 8 प्रमाणे दर्शविलेल्या चतु:सिमा नुसार घरकुलाचे बांधकाम नेमके कोणत्या ठिकाणी केले हे पाहता आले नाही तसेच काही लाभार्थ्यांनी एकाच ठिकाणी संयुक्तपणे एकत्रीत बांधकाम केल्याचे आढळुन आले आहे .
त्यामुळे घरकुल योजनेच्या निकषानुसार संबंधीतांवर नोटीस बजावुन वसुली कार्यवाही करण्या करीता उपरोक्त दिलेल्या लाभार्थ्यांच्या घरांचा पंचासह स्थळपंचनामा करून त्याचे घराच्या आजच्या स्थीतीचे फोटोसह सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, 5) 14 लाभार्थ्यांचे घरकुल कामे पुर्ण झाल्याचे आढळुन आले आहे घरकुल बांधकामाचे निकषा नुसार घरकुल बांधकामे शौचालय पुर्ण झाले असल्यास तशी नमुना आठ नोंद घेवुन काम पुर्ण झाल्याचे नमुना आठ प्रती फोटोसह कार्यालयास सादर करावा. असे सचिव ग्रामपंचायत शारा यांना गट विकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांनी दिलेल्या पत्रात नमुद पत्रानुसार अदयाप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली त्याबाबतची माहिती तसेच मी माझ्या तक्रारीत स्पष्टपणे तक्रारीची चौकशी माझे समक्ष करणे बाबत कळवुन सुध्दा चौकशी माझे समक्ष न होण्याचे कारण काय ? सदरील प्रकरणी घरकुल बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे दिसुन येत असतांना मात्र पंचायत समिती कार्यालयाकडुन फक्त कागदोपत्री चौकशी व पत्रव्यवहार करणे योग्य आहे का ? अश्याच प्रकारे घरकुल न बांधता पंचायत समिती स्तरावरून बांधकामाचा टप्पा न पाहताच लाभार्थ्यांना आर्थीक व्यवहार करून अनुदाचा हप्ते वितरीत होणार का ? आज रोजी सुध्दा मोदी आवास योजना मध्ये अश्याच प्रकारे योजनेत न बसणारे लाभार्थी सर्रासपणे घेणे सुरू असल्याचे माझे निदर्शनास येत आहे. यावरून ग्रामपंचायत कार्यालयास पंचायत समिती कार्यालयाचा पाठींबा आहे का ? असे एक नाही तर अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले आहेत.
गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना दिलेल्या पत्रानुसार व माझ्या मुळ अर्जानुसार आपल्या कार्यालया मार्फत सविस्तर आमचे समक्ष 15 दिवसाचे आत संबंधीतांवर कार्यवाही न झाल्यास आम्ही दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे.