नागरिकांनी स्थानिक दुकानदारां कडूनच खरेदी करा – महेंद्र भैय्या गंधे
अहमदनगर - शहर भाजपचे नागरीकांना आवाहन

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच छोट्यामोठ्या उद्योग धंद्यांना प्रोत्साहन दिलेले आहे. व्होकल फॉर लोकल असा नारा भाजपने दिला आहे.
बाजारपेठ संपन्न झाल्या तरच शहराचा विकास वाढून नाव लौकिकात भर पडेल. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त आपल्या स्थानिक बाजारपेठेतूनच वस्तूंची खरेदी करावी.
दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वच जण मोठ्याप्रमाणात वस्तूंची खरेदी करत आहेत. ही खरेदी करताना आपल्या स्थानिक बाजारपेठांना प्राधान्य देवून स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तूंची खरेदी करा. ऑनलाईन खरेदी करू नका, असे आवाहन भाजपच्या शहर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी महेंद्रभैय्या गंधे यानी केले.
शहर भाजपच्या वतीने गुरवारी सकाळी कापड बाजार येथे व्होकल फॉर लोकल हे अभियान राबवण्यात आले. शहर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी महेंद्रभैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभियानात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना स्थानिक दुकानदारांकडूनच खरेदी करा असे आवाहन करत जनजागृती करणारे पत्रके वाटली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, मध्य मंडल अध्यक्ष राहुल जामगावकर, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, माजी संघटन सरचिटणीस किशोर बोरा, माजी ओबीसी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, संतोष गांधी, गोपाल वर्मा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
वसंत लोढा म्हणाले आपले शहर आपले कुटुंब संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केली आहे. त्याद्वारे शहरातील बाजारपेठांना प्राधान्य देण्यात येत आहे.
नगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात हे अभियान राबवण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित व विश्वनीय खरेदीसाठी स्थानीक बाजारपेठांमध्येच खरेदी करावी.
यावेळी किशोर बोरा, बाबासाहेब सानप, प्रिया जानवे, महावीर कांकरिया आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कसूम शेलार, अमोल निस्ताने, अनिल गट्टानी, लीला अग्रवाल, घनश्याम घोलप, सुमित बटूळे, श्रीकांत फंड, मल्हार गंधे, संजय ढोणे, ज्योती दांडगे, रेखा विधाते, लक्ष्मीकांत तिवारी, सागर शिंदे, सुनील तावरे, सौ.जंगम, जोशी, ऋग्वेद गंधे, सिद्धेश नाकाडे आदी उपस्थित होते.