ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग

अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे. एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.

एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यु 

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज पहाटे एका घराला आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला आधी ही आग लागली.

त्यानंतर आग थेट वरच्या मजल्यावर असलेल्या घरापर्यंत पोहचली. पहाटेची वेळ असल्याने येथील व्यक्ती साखर झोपेत होते. या सर्वांना आजची सकाळ पाहता येणार नाही असा विचारही त्यांच्या मनात कधी आला नसेल.

दुकानाजवळ एक इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंगला लावली होती. यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली अशी माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे