ब्रेकिंगमहाराष्ट्र
मतदान होताच जनतेला आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढ लागू
लोकसभेचे मतदान पूर्ण होताच आता टोल दरात वाढ करण्यात आली आहे. आजपासून देशभरातील महामार्गावर अतिरिक्त टोल द्यावा लागणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे महाग पडणार आहे. २ जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावरील टोल दरात वाढ होत आहे.
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. हा दरवर्षीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. ही दरवाढ आधीच होणार होती, मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.
यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता ३ जून २०२४ पासून टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येत आहे. सोमवारपासून देशभरातील १,१०० टोल प्लाझावर टोल दरवाढ होणार आहे.