ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विखे की लंके? निकाल यायला उशीर होणार, रात्री ८ वाजतील…

अहमदनगर

अहमदनगर लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. अहमदनगर लोकसभेची लढत अत्यंत घासून झाली असल्याने याचे काय निकाल येतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. आज ४ जून ला सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

परंतु आता याबाबत एक महत्वाची बातमी आहे. अहमदनगर लोकसभेत कोण विजयी झाले? निलेश लंके की सुजय विखे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. साधारण रात्री ८ तरी हा निकाल यायला लागतील असे म्हटले जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभेचा जो निकाल आहे तो राऊंड नुसार होणार आहे. फेऱ्या अनेक आहेत.

नगर शहरासाठी कमीतकमी २१ राउंड आहेत. तर जास्तीत जास्त राउंड २७ आहेत. त्यामुळे जर एका फेरीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारण अर्धा तास पकडला तरी परिपूर्ण निकाल यायला साधारण ८ ते ९ तरी वाजतील असा अंदाज आहे.

ट्रेंड दुपारनंतर कळेल

दरम्यान प्रत्येक फेरीनंतर काय ट्रेंड आहे ते साधारण दुपारीपर्यंत कळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राउंडचा निकाल टीव्हीमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न असेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एकंदरीतच अहमदनगरचा परिपूर्ण निकाल यायला साधारण रात्री ८ ते ९ तरी वाजतील असे म्हटले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे