ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

२००४ लाच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती झाली होती निश्चित

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना पक्षाबाबत अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपली भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ लाच युती होणार होती. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलादेखील ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचं असं ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती.

ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसं सहभागी करून घेतलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती.

कारण त्यांना वाटत होतं की या युतीमुळे त्यांचं दिल्लीतलं महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु, शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतले पक्षश्रेष्ठी पवारांचंच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली.

त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतोय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे