पद्मशाली स्नेहींता संघमने तिळगुळ समारंभ वेगळ्या पद्धतीने साजरा केला..
अहिल्यानगर

सालाबाद प्रमाणे या ही वर्षी पद्मशाली स्नेहिता संघम ने संक्रांत तिळगुळ समारंभ अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला…
निराधार मुलामुलींसाठी चालविले जाणारे ” सावली ” या संस्थेत जाऊन मुलांसोबत तिळगुळ समारंभ साजरा करण्यात आला.. सर्वप्रथम संस्था चालक अध्यक्ष नितेश बनसोडे यांनी संस्था स्थापनेपासून तर आज पर्यंत ची वाटचाल या विषयी माहिती दिली.. आलेल्या अडचणी आणि दिलेले मदतीचे हात हे ऐकून त्यांच्या निस्वार्थ कार्याची महिलांना कल्पना आली..
अध्यक्ष डॉ. रत्ना बल्लाळ यांनी स्नेहींता संघमची माहिती दिली..आणि स्नेहींता संघम तर्फे शाल श्रीफळ देऊन बनसोडे यांचा सत्कार करून रोख रकमेचा धनादेश देण्यात आला..
प्रमिला चिल्का यांचे तर्फे १५ मुलींसाठी नवीन कपडे ड्रेस देण्यात आले..सपना छिंदम व सरोजनी रच्चा यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले..
या प्रसंगी महिलांनी मुलांसोबत हसत खेळत सवांद साधला..त्यांचे निरागस हास्य पाहून खुप समाधान वाटले.
या प्रसंगी नीलिमा अडगटला , साधना कोलपेक .रोहिणी पागा ,निता बुरा ,सविता एक्कलदेवी ,अनिता क्यादर , पूनम वन्नम यांनी सहकार्य केले..