ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

357 गावांत दूषित पाणी

अहमदनगर

जिल्ह्यात विविध योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जलजीवनच्याही योजनांची त्यात भर पडली आहे. मात्र, काही ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे.

गेल्या सहा महिन्यांत तब्बल 357 गावांतील नमुन्यांचा त्यात समावेश आहे. यात नगर, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांतील सर्वांधिक गावे आहेत.

जिल्हा परिषदेच्या भूवैज्ञानिकांतर्फे दर महिन्यांला पाणी नमुने तपासले जातात. गेल्या सात महिन्यांतील गावांतील पाणी नमुने जैविक तपासणी अहवालातील टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. सात महिन्यांची दूषित पाणी नमुन्याची टक्केवारी 3.27 आहे तर गेल्या ऑक्टोबरमधील टक्केवारी 2.51 आहे. यात जिल्ह्यातील 35 गावांचा समावेश असून पारनेर, अकोले, राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील सर्वांधिक गावे आहेत. तर श्रीरामपूर, श्रीगोंदा, राहाता, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही.

ऑक्टोबर महिन्यांत (2023) महिन्यांत 1 हजार 392 पाणी नमुने तपासणी करण्यात आली. त्यात 35 नमुने दूषित आढळून आले. तर गेल्या सात महिन्यांत 10 हजार 942 ठिकाणचे पाणीनमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. त्यात 357 ठिकाणी नमुन्यात दोष आढळला आहे.

ज्या ठिकाणी पाणीनमुने दूषित आढळतात. त्या ग्रामपंचायतींना गटविकास अधिकार्‍यांमार्फत उपाययोजना करण्यास सांगितले जाते. उद्भवाजवळ गटार किंवा कारखाने असतील तर तेथील पाणी दूषित आढळते. त्याच ठिकाणचा नमुना दुसर्‍यांदा दूषित आढळल्यास त्याकडे लक्ष पुरविले जाते. दरमहा तपासणी केल्याने दुषित पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करता येते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे