
महिलांना बचत गटा पुरते मर्यादित न ठेवता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना महिलांसाठी असून त्या योजनांचा लाभ महिलांना मिळून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे, संघटना म्हणजे एक विचार असते, त्या चांगल्या विचारातून महिलांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, महिलांनी आता पुढे येऊन योजनांचा लाभ घेत महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खंबीर नेतृत्व मिळाले आहे, त्या माध्यमातून महिला संघटना उभी करण्यासाठी काम करावे.
रेश्मा आठरे ह्या गेल्या अनेक वर्षापासून महिला संघटन मजबूत करण्याचे काम करत आहे, त्यांचे काम चांगले असून त्यांनी महिलांमध्ये जनजागृतीचे काम करावे जेणेकरून महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ होईल, संघटनेच्या माध्यमातून चांगले नेतृत्व पुढे येत असते, चांगल्या विचारांची माणसे एकत्र आल्यानंतर चांगले काम उभे राहत असते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर शहर जिल्हा महिला राष्टवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेश व पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी आमदार संग्राम जगताप, अहमदनगर महिला पक्ष निरीक्षक जयश्री पालवे, शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, युवती शहर जिल्हाध्यक्ष अंजली आव्हाड, लता पवार, सुमित कुलकर्णी, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला पक्ष निरीक्षक जयश्री पालवे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे संघटन केले जाणार आहे रेश्मा आठरे यांचे नगर शहरांमध्ये चांगले काम आहे असे त्या म्हणाल्या.
रेश्मा आठरे म्हणाल्या की, शहरामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे संघटन चांगले असून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणी काम करत आहोत चांगल्या कामाच्या माध्यमातून महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे याचबरोबर पक्ष बांधणीसाठी महिलांना विविध पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिले आहे संघटनेच्या माध्यमातून नगर शहरांमध्ये महिलांसाठी चांगले काम उभे केले जाईल असे त्या म्हणाल्या.
उपाध्यक्ष निर्मलाताई जाधव, सुरेखा कडूस, सुनंदा कांबळे, लता गायकवाड, किरण कटारीया, अपर्णा पालवे, रंजना उकिर्डे, रजनी अमोदकर, राजश्री पवार, स्मिता पोखरणा, वैशाली गुंड, शालिनी राठोड, ओबीसी अध्यक्ष रेणुका ताई पुंड, बुरूडगाव विभाग अध्यक्षा संगीता कुलट, भिंगार विभाग अध्यक्षा अनिता दुराळे शेख , जोत्स्ना बनसोडे.. सरचिटणीस अशा चेमटे, कुसुम शिंदे, गीता कामत, शितल राऊत, रेश्मा मुलानी, सुनिता पाचारणे, पूजा पाटील, पुष्पा थोरात, मायाताई कोल्हे, रेखा भोईटे, प्रीती संचेती, ज्योती निकम, सचिव सारिका खताडे, हिना शेख, संगीता उल्हारे, शोभा तांदळे, तब्बसुम शेख, अर्चना केदारी, सायरा शेख, मनीषा आठरे, संगीता सुकाळकर, शितल गाडे, वर्षा पाटोळे, फरिदा शेख, गायत्री ठोंबरे, रेखा जाधव, रत्नमाला जाधव.
नवीन प्रवेश – दिपाली आढाव, शारदा जगदाळे, सुवर्णा गिऱ्हे, रेणुका मिसाळ आदींचा समावेश आहे