ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
लकाकी फाउंडेशन च्या कुटुंब वृध्दाश्रमास डॉ. रत्ना बल्लाळ यांची आर्थिक मदत
अहमदनगर प्रतिनिधी

मा. शालिनीताई विखे पाटील अध्यक्षा जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला..
लकाकी फाऊंडेशन संचलित सुरु केलेल्या कुटुंब वृध्द-आश्रमच्या उद्घाटन प्रसंगी वृध्दांसाठी डॉ. रत्ना बल्लाळ यांनी पाच हजार रुपयांचा चेक संस्थापक उमा बडगु व सारीका सिद्धम यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अर्पण केला.
रत्ना ताई पेशाने डॉक्टर असल्याने कुटुंब वृध्दाश्रमातील वृद्धांना स्वतः भेट देऊन मोफत औषधपचार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देऊन आपण वेळोवेळी वैद्यकीय सेवा करू असे त्यांनी आश्वासन दिले.
आयोजकांनी डॉ. रत्ना बल्लाळ यांचा यथोचित सत्कार करून धन्यवाद दिले.