
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. राज्यात शिंदे-भाजप सरकार असलं तरी अनेक भागात दोन्ही पक्ष आजही एकमेकांसमोर उभे आहेत.
रायगडमध्येही तशीच काहीशी स्थिती आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडत रायगड लोकसभेच्या जागेवर हक्क सांगितला आहे. रायगड लोकसभेची जागा मिळाली नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा अलिबागमध्ये ग्रामपंचायत निवडणूक विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभात दिला आहे ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपच्या असहकार भूमिकेनंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारला असून या भूमिकेला आमदार दळवी यांनी पाठिंबा दिल्याने याचे गांभीर्य वाढले आहे.
मित्र पक्षात सुधारणा झाली नाही तर तुमचा हिशोब करायला आम्ही कमी पडणार नाही, असा इशाराच आमदार दळवी यांनी भाजपसह राष्ट्रवादीलाही दिला आहे.