
आयसीसीने टी – २० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी एक नवा नियम लागू केला आहे. सध्या हा नियम फक्त पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी – २० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी आहे.
या नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा कमी कालावधीचे अंतर ठेवण्याचे बंधन असेल. दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा जास्त कालावधी वाया गेला तर त्याची नोंद केली जाईल. ही चूक तीन वेळा केली तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला थेट पाच धावांचा दंड केला जाईल.
भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून टी – २० मालिका सुरू होत आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेपासून नवा नियम लागू होणार आहे.