ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

गुंफण…या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर यांनी खुपच सुंदर पध्दतीने नात्यांमधुन मांडलेली आहे.. ती कशी ?? नक्कीच वाचा..

डोंबिवली

एखाद्याच आपल्यामध्ये असणं आपल्याला खूप काही देऊन जातं.

त्याच्या असण्यानं मन नेहमी स्थिर राहत, तो नसेल तेव्हा सगळंच चूकत जातं.त्याच व्यक्तीचं राज्य असावं आपल्यावर असं वाटत कारण ती व्यक्ती असल्यावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हिंमत . कसलाही अहंम नाही त्याच्यात आणि स्वार्थाचा तर लवलेशही नाही. म्हणूनच अशी जिवलग मैत्री तुमच्यातील प्रत्येकाच्या जीवन प्रवासात असलीच पाहिजे आणि अशी मैत्री लाभणे म्हणजे भाग्यच.होय..संयम हाच सर्वश्रेष्ठ मित्र आहे.आपल्या प्रत्येकाच्या आतील मी जेव्हा एखाद्या बरोबर जुळतो तेव्हा आम्ही चा जन्म होतो. या आम्हीला आम्ही ठेवायचं की माझी मी करायचे हे प्रत्येकातील मी वर अवलंबून असते.संशयाने मनात विचारांचा गुंता होतो आणि तो सुटता सुटत नाही.पण मायेची गुंफण ती मात्र सुटू नये असे वाटते.गुंता आणि गुंफण यात फरक एवढाच की गुंता संशयाने होतो, गुंफण संयमाने केली जाते.गुंता सोडवताना तुटलं जातं, गुंफण सहज आणि हलकीच सोडवता ही येते.गुंत्यात विश्वासाचा अभाव असतो, गुंफणीत विश्वासू स्वभाव असतो. या जगात सर्वात महाग “जागा” कोणती ?

मी म्हणालो जी आपण दुसर्याच्या ?”मनात” निर्माण करतो ती महाग जागा ! तिचा भाव करता येऊ शकत नाही. अन् ती एकदा जर ग? गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं. पण माणुसकीच्या नात्याने हे सहज शक्य होऊ शकतं. मला तर खूप अनुभव समोरच्या व्यक्तींनी स्वतःच्या कडू , वाईट आणि चुकीच्या विचारांनी माझ्यावर चिकलफेक करण्याची.

पण मला त्याचे वाईट नाही वाटत, अश्या अशुद्ध विचारांनी माझे चरीञ नाही बाटत आणि मन ही विचलित होऊ देत नाही कारण मला स्वतःला समुद्रासारखं जगायला आवडतं. सारं काही स्वीकारायचं आणि योग्य ते आपल्याबरोबर घेवून नको असलेल कीनाऱ्यावर आणून टाकायचं.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे