ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

इनरव्हिल अहमदनगर विनस या क्लब चा नवीन उपक्रम – अनामप्रेम मधील मुलांना रेनकोट वाटप…

अहमदनगर प्रतिनिधी

अनामप्रेम या संस्थेने आजवर एक हजारांहून अधिक अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास साहाय्य केले आहे. समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटक असलेल्या अपंगांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम ही संस्था करीत आहे.

शिक्षणाशिवाय वंचितांचे संपूर्ण पुनर्वसन अशक्य आहे, हे जाणून अपंगांच्या शिक्षणासाठी नगर शहरात, शहराजवळील निंबळक येथे आणि पुणे अशा तीन ठिकाणी संस्थेने वसतिगृहे सुरू केली आहेत. तेथे १८० अपंग शिक्षण घेत आहेत.

अपंगांच्या २१ प्रकारांपैकी अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग आदींच्या पुनर्वसनावर ‘अनामप्रेम’ने लक्ष केंद्रित केले आहे.

दिवंगत समाजसेवक डॉ. बाबा आमटे आणि ‘स्नेहालय’चे मार्गदर्शक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्नेहालय परिवारातीलच काही युवकांनी अपंगांच्या पुनर्वसनासाठी २००६ च्या सुमारास ‘अनामप्रेम’चे काम सुरू केले. छोट्या-छोट्या देणगीदारांच्या आधारावर संस्थेचे काम सुरू आहे.

इनरव्हिल क्लब च्या या उपक्रमात गरजु मुलांना  रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच नुकतेच काळाची गरज म्हणून पेपर विक्रेत्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी सौ.श्रीलता आडेप यांच्या हस्ते देण्यात आले. व सोबत सौ. रितु पांडे या ही उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे