ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ?

अहिल्यानगर

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्याची तयारी सुरू असून, या पदांसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. सत्ता स्थापनीनंतर भाजपने ‘संघटनात्मक पर्व २०२५’ हाती घेतले आहे, ज्याअंतर्गत नव्या निवडी केल्या जाणार आहेत.

पहिल्यांदाच शहर व जिल्हा पातळीवरील नियुक्तीनंतर थेट प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असल्याचे समजते. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबूत करण्यासाठी हा पाऊल उचलला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात पक्षाने विस्तार आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर भर देण्याचा निर्धार केला होता.

शहर, दक्षिण-उत्तर जिल्हाध्यक्ष पदांसाठी रस्सीखेच

शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्ष पदांवर कोणाला संधी मिळणार यासाठी अनेक नावांचे उच्चार केले जात आहेत. उत्तरेच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जालिंदर वाकचौरे, नितीन दिनकर, नितीन कापसे, राजेंद्र गोंदकर यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी युवराज पोटे, मनोज कोकाटे, शामराव पिंपळे, मृत्युंजय गर्जे, बाळासाहेब महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

अहिल्यानगर शहराध्यक्षपदासाठीही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सचिन पारखी, बाबासाहेब सानप, दामोदर बठेजा, राजेंद्र काळे, बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. एकदा शहर व जिल्हाध्यक्ष नियुक्ती पूर्ण झाली की, थेट प्रदेशाध्यक्ष पदाचा फैसला होईल, अशी चर्चा आहे.

शिर्डी अधिवेशनात ठरले नियोजन

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने शिर्डी येथे दोन दिवसीय अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनात पक्ष विस्तार आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर भर देण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानुसार, आता ‘संघटनात्मक पर्व २०२५’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जिल्हा, शहर, तालुका अध्यक्षांची नियुक्ती पटकन करण्यात येणार असून, १५ मार्चपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल, असे पक्षातील वरिष्ठांनी सूचित केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे