ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमधील मुस्लिम कुटुंबातील १० जणांनी स्वीकारला हिंदू धर्म, बागेश्वर बाबांच्या हस्ते घेतली दीक्षा

अहमदनगर

अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील १० सदस्यांनी बुधवारी धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्म स्वीकारला आहे.

छत्रपती संभाजीनमध्ये श्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील १० सदस्यांनी बुधवारी धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्म स्वीकारला.

लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करीत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करीत असल्याच्या भावना शेख यांनी व्यक्त केल्या आहेत.

जमीर शेख यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न हिंदू धर्मात करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. व्यवसायाने मजूर असलेले शेख लहानपणापासून हिंदू रिवाजांनुसार पूजापाठ करत आहेत. त्यांना हिंदू धर्मात यायचे होते. त्यासाठी काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना या कार्यक्रमात या धर्मांतराची संधी मिळवून दिली.

या धर्मांतरासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे