
देण्याच्या कारणावरून अमोल रेवडकर व आशिष खांबट (रा. वरुर), यांना महेश बाळासाहेब काटे रा. आखेगाव याने काहीतरी धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना हॉटेल राजयोग समोर पाथर्डी येथे शेवगाव रस्त्यावर घडली.
पैसे देण्याच्या कारणावरून अमोल रेवडकर व आशिष खांबट (रा. वरुर), यांना महेश बाळासाहेब काटे रा. आखेगाव याने काहीतरी धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना हॉटेल राजयोग समोर पाथर्डी येथे शेवगाव रस्त्यावर घडली.
याबाबत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महेश काटे याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, २७ जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अमोल रेवडकर व आशिष खांबट हे वरुर येथील राहणारे आहेत.
महेश बाळासाहेब काटे यांच्या ते ओळखीचे आहेत. तिघेजण पाथर्डीत हॉटेल राजयोगच्यासमोर उभे होते. बोलताना वाद झाला.