ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली युवा शक्ती कडून श्री मार्कंडेय पतसंस्था चे नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला

अहमदनगर

श्री मार्कंडेय पतसंस्था च्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा पॅनल चे सर्व सदस्य भरघोस मताधिक्याने निवडून आले असल्याकारणाने सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट, नगर शहर व पद्मशाली महिला शक्ती यांच्या कडून सत्कार करण्यात आले.

यावेळी संस्थेने सभासदांना तत्पर सेवा प्रदान केल्यामुळे तसेच सभासदांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी मोलाची खंबीर साथ दिल्यामुळेच जनसेवा पॅनल सभासदांनी भरघोस मतदान केले असल्याचे संचालक बालराज सामल यांनी सांगितले.

श्री मार्कंडेय पतसंस्थेचा प्रगतीचा ग्राफ दरवर्षी वाढत नेण्यात संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. पतसंस्थेमार्फत शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी वातानुकुलीत सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी आभ्यासिका चालविणे, महावितरणचा वीज बिल भरणा स्वीकारणे, महिलांसाठी विशेष योजना चालवणे, रक्तदान शिभिराचे आयोजन करणे, अशी उपक्रमे देखील केली आहेत असे संचालक विनायक मच्चा यांनी सांगितले.

श्री मार्कंडेय पतसंस्था हि कामकरी कष्टकरी पद्मशाली समाजातील सभासदासाठी एक अमृतवाहीनीच आहे. या पतसंस्थेमुळे समाजातील अनेक होतकरू युवकांना रोजगार सुरु करणे साठी, लग्न समारंभासाठी तसेच अनेक शुभ कार्यासाठी आर्थिक मदत विना विलंब उपलब्ध करून देणारी एक मोठी पतसंस्था नगर शहराच्या मध्यवर्ती उपलब्ध आहे. असे पद्मशाली युवाशक्ती चे सुमित इप्पलपेल्ली यांनी सांगितले .

यावेळी पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक बालराज सामल, कोडम नारायण, मच्चा विनायक, चिप्पा संजय, इराबत्तीन उमेश, अंदे दत्तात्रय, शेराल अशोक, भिंगारदिवे गौतम, कोटा सविता, बिंगी प्रमिला, वेदपाठक गणेश तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि पद्मशाली युवाशक्ती चे योगेश म्याकल, सुमित इप्पलपेल्ली, दीपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, अजय म्याना, सागर बोगा, विराज म्याना व पद्मशाली महिला शक्ती चे सुरेखा विद्ये, सारिका सिद्धम, सुनंदा नागुल , लक्ष्मी म्याना, उमा बडगु उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे