लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी..होळीनिमित्त मिळणार हे खास गिफ्ट
प्रतिनिधी अहिल्यानगर - संगीता खिलारी

राज्य सरकारकडून स्वस्त धान्य लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशनकार्ड धारकांना होळीच्या सणाच्या निमित्ताने एक खास गिफ्ट दिले जाणार आहे. यंदा होळीच्या सणाला रेशनसोबत एक साडीही दिली जाणार आहे.यामुळे महिलांना दिलासा मिळणार असून, राज्य सरकारचा या उपक्रमामुळे त्यांचे जीवन साकारत आहे.
अंत्योदय योजना यापूर्वी राज्य सरकारने अंत्योदय योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलांना एक साडी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर यंदाही होळीच्या सणावर रेशनकार्ड धारक महिलांना साडी देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात 44,160 महिलांना, तसेच पुणे जिल्ह्यात 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये साड्यांचे वितरण केले जाईल. बारामती तालुक्यात 7,975 महिलांना, दौंडमध्ये 7,222, जुन्नरमध्ये 6,838, पुरंदरमध्ये 5,285, तसेच इतर तालुक्यांमध्ये साड्यांचे वितरण होईल. यासोबतच, त्या महिलांना दिलेल्या साड्या गुणवत्ता तपासून दिल्या जाणार आहेत.