देशातील सर्वात सुंदर अमृत वाटिकेसाठी माती देण्यास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -भैय्या गंधे
अहमदनगर

देशाचे लोकप्रिय व कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृभूमीला वंदन करण्यासाठी ‘माझी माती माझा देश’ चा नारा दिला. या संकल्पनेतून पूर्ण देशातून माती संकलित करून राजधानी दिल्लीत अमृतवाटिका साकारण्यात येणार आहे.
ही अमृतवाटिका देशातील सर्वात सुंदर गार्डन आहे. अमृतवाटिकेसाठी माती देण्यास नगर शहरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भिंगार येथे ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला आहे. दिवाळीसणा निमित्ताने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘मागेल त्याला दाळ’ या दिलासादायक योजनेतंर्गत केवळ ६० रुपये प्रति किलो दराने हरभरा दाळ मिळत आहे. याचा लाभही सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नगर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा नगरसेवक भैय्या गंधे यांनी केले.
भिंगार भाजपच्या वतीने आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत भिंगारच्या नागरिकांनी अमृत कलशामध्ये माती जमा करण्यास मोठा प्रतिसाद दिला.
नगर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा नगरसेवक भैय्या गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास भिंगार छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंत राठोड, शहर भाजपचे ओबीसी मोर्चाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, भिंगार भाजयुमोचे अध्यक्ष किशोर कटोरे, सुमित बटुळे, लक्ष्मीकांत तिवारी, यश शर्मा यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक मध्ये वसंत राठोड म्हणाले, भिंगर मधील नागरिक भाजपच्या प्रत्येक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ भिंगार वासीय मोठ्या प्रमाणात घेत आहेत. ‘माझी माती माझा देश’ व मागेल त्याला डाळ हे दोन्ही उपक्रम भिंगारमध्ये भाजपच्या माध्यमातून भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबवण्यात आले आहेत.
यावेळी भाजपा ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष तय्याब बेग, किशोर बोरा, सुरेश तनपुरे, संतोष हजारे, महेंद्र जाधव, योगेश दळवी आदींसह भिंगार शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.