सौ. प्राजक्ता म्हाप्रोळकर यांना ग्रंथालय आणि माहिती शास्त्रची पी एच डी प्रदान.
मुंबई

मुंबई येथील कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन या ठिकाणी सिनियर लायब्रेरियन या पदावर कार्यरत असलेल्या सौ. प्राजक्ता म्हाप्रोळकर यांना नुकतीच ग्रंथालय व माहिती शास्त्र या विभागातून संशोधन केल्या बद्दल एस एन डी टी महिला महाविद्यापीठ अंतर्गत “”मुंबई आणि ठाणे विभागातील महिला ग्रंथपालांचा व्यावसायिक विकास आणि त्यामधील येणाऱ्या अडचणी” या विषयावर पी एच. डी. ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांचे गाईड म्हणून डॉ. ज्योती बाबल यांनी अचूक मार्गदर्शन केले तर डॉ. सुभाष चव्हाण , डॉ., डायरेक्टर – एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय तसेच डॉ. भुपेंद्र बनसोड डॉ. सारिका सावंत, तसेच डॉ. दिलीप जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शनपर प्रोत्साहन लाभले.
सौ. तृप्ती तुळसनकर , कादंबरी मांजरेकर,संध्या यादव, डॉ.मनीषा दांडगव्हाळ, मनीषा सामंत, डॉ.मीना सूर्यवंशी, डॉ. शीला गोडबोले, गीतांजली वाणी यांनी वेळोवेळी सहकार्य केले. डॉ. प्राजक्ता म्हाप्रोळकर यांना मिळालेल्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे.
या यशा बद्दल शैक्षणिक सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.