ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. कालपासून अनेक भागात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं.
मराठवाड्यात आंदोलन अधिक तीव्र होत असताना आंदोलकांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना यावेळी टार्गेट केलं. कालच्या दिवसात जवळपास डझनभर बसेसचे या आंदोलनात नुकसान झालं आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या बसेस रद्द केल्या आहेत. मराठवाड्यात आक्रमक आंदोलन सुरू असल्यानं शिवाजीनगरहून त्या भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
एसटी बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.