शहरातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन

सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर मुलं सर्वाधिक वेळ वाया घालवत आहेत. यामुळेच मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढत असल्याचं समोर आलं आहे.
सहा तासांहून अधिक वेळ
यातील 61 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात. यातील बहुतांश वेळ हा गेमिंग किंवा सोशल मीडियावर जातो. 39 टक्के पालकांनी सांगितलं, की त्यांची मुलं 1 ते 3 तास मोबाईल घेऊन बसतात. 46 टक्के पालकांनी हे प्रमाण 3-6 तास असल्याचं सांगितलं, तर 15 टक्के पालकांनी हे प्रमाण 6 तासांहून अधिक असल्याचं सांगितलं.
सुधारणेसाठी प्रयत्न
लोकल सर्कल्स ही सर्वेक्षणाची आकडेवारी आता भारत सरकारला देणार आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालयाला ही माहिती दिली जाणार आहे. ज्यामुळे, लहान मुलांमधील या वाढत्या समस्येवर काही तोडगा काढता येईल.
पालकांची मागणी
या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 73 टक्के पालकांनी म्हटलं, की डेटा संरक्षण कायद्यामध्ये या समस्येबाबत तरतूद हवी. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया, ओटीटी किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करायला हवं, अशी मागणी पालकांनी केली आहे.