वाल्मीक कराडच्या नावावर किती संपत्ती ? धनंजय मुंडे सोबत कंपन्यांमध्ये पार्टनरशिप
अहमदनगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचा थेट खून प्रकरणात हात असल्याचा आरोप होत आहे.
जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि त्यापाठोपाठ सुरेश धस यांनीही वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केलाय.बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचा थेट खून प्रकरणात हात असल्याचा आरोप होत आहे. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि त्यापाठोपाठ सुरेश धस यांनीही वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केलाय.
दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित व्यवसाय असल्याचा म्हटलं आहे. शनिवारी त्या बीडमध्ये पदयात्रा काढणार आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि वाल्मिक कराडला अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये ठाण मांडून बसणार असल्याचं दमानिया म्हणाल्या.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
इतकी निर्घृण हत्या करणाऱ्या माणसांना आपण माणसं म्हणू शकत नाहीत, ही अक्षरशः हैवान आहेत. यांच्याविरोधात लढा उभा केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यात असलं राजकारण सुरु होईल. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं सख्य कसं आहे, या संदर्भात अनेक फोटो, व्हिडिओ बाहेर आले आहेत.
वाल्मिक कराडचे अनेक राजकारण्यांसोबत फोटो आहेत. मुख्यमंत्र्यांपासून सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासोबत फोटो आलेत. सर्वच म्हणतात वाल्मिक कराड गुंड प्रवृत्तीचा आहे, रोहित पवार जुलैमध्ये असंच म्हणाले होते. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरून वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही, असं म्हटलं होतं.
”वीस दिवस झाले वाल्मिक कराड अजूनही मोकाट आहे. त्याला कधी अटक होईल, हे सांगता येत नाही. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन कंपन्यांमध्ये भागीदार आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगमित्र शुगर. अगोदर धनंजय डायरेक्टर होते आता त्यांची पत्नी डायरेक्टर आहे, तेही नावापुरतं.”
दमानिया पुढे म्हणाल्या की, दोघांचीही नावे त्या कंपनीच्या सातबारावर आहेत. 88 एकर जमिनीवर त्यांची नावे आहेत. फक्त हे कंपन्यात एकत्रच नाहीत. सातबारावर जमिनीच्या व्यवहारात एकत्र आहेत आणि दहशतीसुद्धा एकत्र आहेत.