महाराष्ट्र सहकार कायदा 1960 चे कलम 83 प्रमाणे श्री मार्कंडेय ना.सह. पतसंस्थेची चौकशी करावी – पुरुषोत्तम सब्बन
अहमदनगर

अहमदनगर येथील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था, दिल्लीगेट या संस्थेने कायद्या मधे कोणतीही तरतूद नसतांना बेकायदेशीर पणे संस्थेची नफ्याची रक्कमेचा अपहार करण्याच्या गैर उद्देशाने नफ्याची तरतुदीची रक्कम रु.4,61,96,355/- थकीत कर्ज व्याज देणे म्हणुन तरतूद केलेली आहे याची चौकशी व्हावी म्हणुन संस्थेचे जागृत सदस्य पुरुषोत्तम सब्बन यांनी मा. तालुका उपनिंबधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्या कडे केली आहे.
मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था ही अहमदनगर शहरांतील गोर गरीब, मोल मजुरी करणारे विडी कामगार यांनी स्थापन केलेली संस्था असताना याचे काही पदाधिकारी संचालक यांनी बँकेला ब्लॅकमेलिंग करून संस्थेचे पदाधिकारी व संचालक झालेले आहे या मुळे संस्था अधोगतीला जात आहे सदर संस्थेचे काही संचालक अशिक्षित असल्यामुळे व आर्थिक गैव्यवहार करण्याचे गैर उद्देशाने कारभार चालत असल्यामुळे गोर गरिबांची रक्कमेचे अपहार होवू नये या उद्दशाने पुरुषोत्तम सब्बन यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 चे कलम 83 प्रमाणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
पतसंस्थेने सन 2022-23 या आर्थिक वर्षात संस्थेचे थकीत कर्ज व्याज देण्याची तरतूद म्हणुन 4 कोटी पेक्षा जास्त रक्कम तरतूद केली आहे. या पूर्वीच्या वार्षिक अहवालात कोठेही अशा प्रकारचा व्याज देण्याची तरतूद केलेली नाही याचाच अर्थ कर्जदार यांनी मागील 3 ते 4 वर्षात थकीत कर्जाची रक्कम मोठी असल्यामुळे संस्थेचा एन पी ए वाढलेला असल्या कारणामुळे संस्थेस आज पावेतो मिळालेल्या संपूर्ण नफ्याची तरतूद ही थकीत कर्जव्याज देणे म्हणुन करावी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
याचाच अर्थ संस्थेची कर्जथकबाकी मोठ्या प्रमाणात झालेली असून संस्थेचे संचलक हे कर्ज वसुली व थकबाकीदारा कडून वसुली करण्यास निशफळ ठरलेले असून अशीच परिस्थिती राहिल्यास संस्था लवकरच अवसायनात निघण्याची शक्यता असल्यामुळे संस्थेची व संचालकांची चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी संस्थेचे जागृत सदस्य पुरुषोत्तम सब्बन यांनी केली आहे.