सौ. आश्विनी मुंगी.राहणार- गुजरगल्ली,शनीचौक,अहमदनगर.यांच्या अतिशय सुंदर उपक्रमाची दखल AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म नी घेतली आहे.
अहमदनगर

१५ जानेवारी सर्वत्र मकरसंक्रांत साजरी होत आहे. उद्या सर्व महिला सजुन छान आवरून आपल्यातील जवळपास मंदीरात पुजेसाठी जातात. आणि ओसा करताना शेतकरी वर्ग ने पिकवलेली ऊस , गाजर, शेंगा, हरबरा, अशा वस्तु ओसा म्हणून अंगावर टाकतात.
पुजेनंतर सर्व मंदीरात त्याचा खच पडलेला असतो पायदळी तुडवून जातात. या वर्षी अवकळी पाउस व शेतकरीवर्ग संकटात आहे. तरी अन्नाची कदर करा. द्यायच असेल तर ताटात टाका अन्नाची व शेतकरी वर्गाची कदर करा.
त्या पुढे असे म्हणाल्या की मी स्वतः फक्त या महिलांना सांगायला जातात. मुळात त्यांना हे पटत नसल्याने ज्या महिला हे सर्व वाण चितळे रोड व अन्य ठिकाणी विकतात.
ताई स्वतः त्यांना वडापाव किंवा समोसा असा नाष्टा देऊन कुंकु लावतात.
अशा चांगल्या उपक्रमासाठी AR न्यूज च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन – बोज्जा मॅडम तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी सर यांनी भेट घेऊन या बद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तसेच या उपक्रमास शुभेच्छा देऊन त्यांना मदतीचा हात ही पुढे केला आहे.