ब्रेकिंगमहाराष्ट्र
बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झालं.अयोध्येतील राम घाटावर झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स
अयोध्या

अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याचा विधी आजपासून सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम घाट परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स झळकलेत. या फ्लेक्सवर शिंदेंसह दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचाही मजकूर आहे.