ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री मार्कंडेय संकुल दातरंगे मळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

अहमदनगर

पर्यावरणाचा ढासळता तोल , जागतिक तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी फक्त कथनी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करत येथील श्री मार्कंडेय संकुलात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिपभाऊ दातरंगे, पै शुभम दातरंगे यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 28 जून रोजी सकाळी प्रत्यक्ष सावली व फळे देणारी चांगली रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘झाडे लावणे ही काळाची गरज आहे. आज झाड लावले तर भविष्यात तेच झाड आपल्याला फळ, फुल, सावली देईल. वातावरणात गारवा निर्माण करेल, पावसाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. हवा शुद्ध होऊन ऑक्सिजनचे प्रमाण टिकून राहील. म्हणून आपण मोठ्या संख्येने झाडे लावायला हवीत आणि त्यांचे संवर्धन करून वाढवली पाहिजे… !!” असे संदीप भाऊ दातरंगे म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितांनी श्री मार्कंडेय महामुनिंच्या प्रतिमेला वंदन करून आणि नामस्मरण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर संकुलाचे ज्ञानेश्वर मंगलारम म्हणाले, ” या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे परिसरातील हिरवळ वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होण्यास हातभार लागेल अशी आशा व्यक्त करतो….!!” तर रघुनाथ गाजेंगी यांनी ही वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी मिळून परिसरात अनेक वड ,पिंपळ, कडुलिंब, खैर, बकुळ, सोनचाफा, आंबा, सहित इतर काही फुलझाडे व वृक्षांचे रोपण केले.

यावेळी ज्ञानेश्वर विट्ठल मंगलारम, कुमार बळीराम आडेप, अजय गुरुड़, रघुनाथ गाजेंगी, विष्णु बेत्ती, भीमराज सिरसुल, रमाकांत बिज्जा, गणेश आकेन, विनायक बत्तीन, नारायण एक्कलदेवी, लक्षण इगे, हनुमान जोग, चंद्रकांत सब्बन, मोहन चैनुर, हनुमान म्याकल, अमोल गाजेंगी, रवि नल्ला, यश मंचे, आकाश सिरसुल, सीताराम ढगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला.

समाज बांधवांनी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात सहभाग घेऊन वृक्षारोपणाची भावना जागृत केली याबद्दल आयोजकांच्या वतीने पै .शुभम दातरंगे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे