ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अहमदनगरचे अहिल्यानगर करण्याची घोषणा तर केली

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाचा वाद अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यातच अहमदनगरचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून ठेवण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी चौंडी येथे केली होती. आता याच मुद्द्यावरून आ. राम शिंदे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकी पूर्वी जिल्ह्याचे नामांतर झाले पाहिजे व तशी आशा सरकारकडून आहे असे आ. शिडीने यांनी म्हटलं आहे. अहमदनगर येथील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दोन आठवड्यां पूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष याकडे वेधले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी याठिकाणी होणाऱ्या शेळी मेंढी महामंडळाच्या कार्यालया बद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील शेळी-मेंढी महामंडळाचे कार्यालय हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळ हे राज्याचे असल्याने ढवळपुरीसारख्या छोट्या गावात कार्यालय असणे सोयीचे नाही. हे जिल्हा किंवा तालुका कार्यालय नाही. हे कार्यालय राज्यातील नागरिकांसाठी सोयीस्कर ठिकाणी असावे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने या कार्यालयाची जागा बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असेही शिंदे म्हणाले.

नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

आ. राम शिंदे यांनी पुनः एकदा अहमदनगर नामांतराचा मुद्दा चर्चेत आणला आहे. नुकतेच आ. प्राजक्त तनपुरे यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यावेळी एक पोस्ट करत हा मुद्दा चर्चेत आणला होता.

त्यामुळे येत्या निवडणुकांत हा मुद्दा प्रचाराचा मुद्दा केला जाऊ शकतो. तसेच स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांना घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे