ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजपची नगर शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर

भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभयराव आगरकर यांनी शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. यात दहा उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस यांच्यासह मंडल अध्यक्ष आणि आघाडी प्रमुखांचा समावेश आहे.

ॲड आगरकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर कार्यकारिणी निवडी कडे लक्ष लागले होते. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जाते.सर्वसमावेशक रूप देण्याचा प्रयत्न ॲड आगरकर यांनी केला आहे.

उपाध्यक्षपदी नगरसेविका सोनाली चितळे, संध्या पावसे, अशोक गंगाधर गायकवाड, अनिल ढवण, अनंत देसाई, धनंजय जाधव, बाबा सानप, महेश झोडगे, प्रवीण ढोणे, तुषार पोटे यांची नियुक्ती केली आहे.

सरचिटणीसपदी सचिन पारखी, अनिल मोहिते, प्रशांत मुथा, सविता कोटा, पंडित वाघमारे, महेश नामदे याना संधी दिली आहे.

विविध आघाडी प्रमुख असे – युवा – मयूर बोचुघोळ, महिला – सुप्रिया जानवे, किसान – राजेंद्र एकाडे, अनुसूचित जाती – नरेश चव्हाण, अनुसूचित जमाती – महेश शेळके, अल्पसंख्यांक – हाजी अण्वर खान, ओबीसी – बाळासाहेब माणिक भुजबळ.

मंडल अध्यक्ष : नितीन शेलार (सावेडी), राहुल जामगावकर (मध्य नगर), शामराव बोळे (भिंगार), निलेश सातपुते (केडगाव).

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे